Live · 30 JuneFree Zoom session: Decoding Pasaydan & Countdown to RichesReserve →

Artificial Non-Intelligence (ANI)

Atul Thakur9 Jun 20261 min read
Share
Artificial Non-Intelligence (ANI)

आज सगळीकडे Artificial Intelligence (AI) ची चर्चा आहे.

पण व्यवसायात, संस्थांमध्ये आणि समाजात मला एक वेगळीच गोष्ट दिसते...

Artificial Non-Intelligence (ANI).

ही अशी अवस्था आहे जिथे:

  • माहिती भरपूर असते, पण विचार नसतो.

  • तंत्रज्ञान असते, पण निर्णयक्षमता नसते.

  • डेटा असतो, पण दिशा नसते.

  • पद असते, पण नेतृत्व नसते.

  • व्यस्तता असते, पण उत्पादकता नसते.

ANI म्हणजे बुद्धिमत्तेचा अभाव नव्हे.

ANI म्हणजे बुद्धिमत्ता वापरण्याची अनिच्छा.

उद्योजकांकडे ERP असते, CRM असते, Accounts Software असते,

पण निर्णय अजूनही अंदाजावर घेतले जातात.

टीम असते, पण जबाबदाऱ्या स्पष्ट नसतात.

मीटिंग्स होतात, पण निर्णय होत नाहीत.

यालाच मी म्हणतो...

Artificial Non-Intelligence.

AI तुमच्या व्यवसायाला वेग देऊ शकते.

पण ANI तुमच्या व्यवसायाला थांबवते.

आजचा प्रश्न AI वापरत आहात का हा नाही.

आजचा खरा प्रश्न आहे:

तुमच्या व्यवसायात Artificial Intelligence जास्त आहे की Artificial Non-Intelligence?

— अतुल ठाकूर
Life Catalyst Pvt. Ltd.

विचार करा:
तुमच्या व्यवसायातील सर्वात मोठा अडथळा तंत्रज्ञानाचा अभाव आहे की उपलब्ध बुद्धिमत्तेचा वापर न होणे?

Be the first to react

Comments

You'll need a quick account to post. We won't spam you.

Be kind. Comments are public.

Loading comments…

Take the next step

Want this clarity in your own life or business?

Book a consultation →

Newsletter

Get new posts in your inbox

No spam. Unsubscribe anytime.