Live · 30 JuneFree Zoom session: Decoding Pasaydan & Countdown to RichesReserve →

Mindset

१२,३१३ उद्योजकांनी जीवन संपवले... पण देश अजूनही शांत आहे!

Atul Thakur10 Jun 20262 min read
Share
१२,३१३ उद्योजकांनी जीवन संपवले... पण देश अजूनही शांत आहे!

१२,३१३ उद्योजकांनी जीवन संपवले... पण देश अजूनही शांत आहे!

शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा देश हादरतो.

चर्चा होते.

राजकारण होते.

मदतीच्या घोषणा होतात.

पण एखादा उद्योजक आत्महत्या करतो तेव्हा?

काही दिवस चर्चा होते आणि विषय संपतो.

पण आकडे काही वेगळीच कहाणी सांगत आहेत.

NCRB च्या आकडेवारीनुसार एका वर्षात १२,३१३ व्यावसायिक आणि व्यवसायिकांनी आत्महत्या केल्या. हे प्रमाण शेतकरी आत्महत्यांपेक्षाही जास्त आहे.

क्षणभर थांबा आणि विचार करा.

ज्या लोकांना आपण "रोजगार निर्माते" म्हणतो, ज्या लोकांमुळे हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, ज्या लोकांमुळे सरकारला कर मिळतो, ज्या लोकांमुळे अर्थव्यवस्थेचे चाक फिरते, तेच लोक आतून इतके तुटत आहेत की त्यांना जीवन संपवावेसे वाटते.

मात्र या वेदनेकडे कोणी पाहत नाही.

उद्योजक हा सर्वात एकाकी माणूस

उद्योजकाकडून सर्वांना अपेक्षा असतात.

कर्मचाऱ्यांना पगार हवा असतो.

बँकेला EMI हवा असतो.

सरकारला कर हवा असतो.

पुरवठादाराला पैसे हवे असतात.

कुटुंबाला सुरक्षितता हवी असते.

समाजाला यशोगाथा हव्या असतात.

पण उद्योजकाला काय हवे आहे, हे कोणी विचारत नाही.

त्याच्यावर असलेल्या मानसिक ताणाची, भीतीची, असुरक्षिततेची चर्चा कोणी करत नाही.

दिवसभर हसतमुखाने फिरणारा उद्योजक रात्री झोपत नसेल, याची कल्पनाही अनेकांना नसते.

व्यवसाय अपयशी झाला म्हणजे माणूस अपयशी झाला का?

भारतामध्ये व्यवसाय अपयशी होणे हा गुन्हा मानला जातो.

व्यवसाय यशस्वी झाला तर सर्वजण अभिनंदन करतात.

पण व्यवसाय अडचणीत आला की त्याच लोकांचे प्रश्न सुरू होतात.

"कशाला एवढा विस्तार केला?"

"जोखीम का घेतली?"

"व्यवसाय सांभाळता येत नव्हता तर सुरूच कशाला केला?"

कोणीही विचारत नाही,

"तुला मदतीची गरज आहे का?"

"आम्ही तुझ्यासोबत आहोत."

"चल, बसून मार्ग काढू."

व्यवसायातील अपयश हे अनेकदा परिस्थितीचे, बाजारपेठेचे, बदलत्या तंत्रज्ञानाचे किंवा आर्थिक चक्राचे परिणाम असतात.

पण समाज उद्योजकाला दोषीच्या पिंजऱ्यात उभा करतो.

उद्योजक अर्थव्यवस्थेचा खरा इंजिन आहे

कारखाने कोण उभे करतो?

रोजगार कोण निर्माण करतो?

नवीन कल्पना कोण आणतो?

कर कोण भरतो?

स्थानिक अर्थव्यवस्था कोण जिवंत ठेवतो?

उत्तर एकच आहे – उद्योजक.

तरीही त्याच्या मानसिक आरोग्याविषयी, भावनिक संघर्षाविषयी, आर्थिक दडपणाविषयी बोलले जात नाही.

आपण यशस्वी उद्योजकांचा सत्कार करतो.

पण संघर्ष करणाऱ्या उद्योजकाच्या खांद्यावर हात ठेवत नाही.

खरी समस्या पैशांची नाही

अनेकांना वाटते आत्महत्येचे कारण फक्त आर्थिक अडचण असते.

प्रत्यक्षात मोठी समस्या असते – एकाकीपणा.

कोणाशी बोलू?

कोण समजून घेईल?

लोक काय म्हणतील?

प्रतिष्ठा जाईल का?

घरचे काय विचार करतील?

या प्रश्नांमध्ये अनेक उद्योजक स्वतःला बंदिस्त करून घेतात.

आणि हळूहळू आशा संपत जाते.

प्रत्येक उद्योजकाला एक संदेश

तुमचा व्यवसाय अडचणीत असेल...

कर्जाचा ताण असेल...

झोप लागत नसेल...

सगळे संपल्यासारखे वाटत असेल...

तर कृपया शांत बसू नका.

बोला.

मित्रांशी बोला.

मेंटॉरशी बोला.

कुटुंबाशी बोला.

व्यावसायिक सल्लागारांशी बोला.

समस्या कितीही मोठी असो, तिचा मार्ग असतो.

व्यवसाय पुन्हा उभा राहू शकतो.

पैसा पुन्हा कमावता येतो.

प्रतिष्ठा पुन्हा निर्माण करता येते.

पण जीवन पुन्हा मिळत नाही.

समाज म्हणून आपली जबाबदारी

आपल्या आजूबाजूचा एखादा उद्योजक संघर्ष करत असेल तर त्याला सल्ले देण्यापेक्षा त्याचे ऐका.

त्याला दोष देण्यापेक्षा त्याला आधार द्या.

त्याच्या अपयशाची चर्चा करण्यापेक्षा त्याच्या वेदना समजून घ्या.

कारण प्रत्येक आत्महत्येच्या मागे एक व्यवसाय नसतो.

एक माणूस असतो.

एक कुटुंब असते.

एक स्वप्न असते.

आणि कधी कधी, फक्त एका आधाराच्या हाताच्या अभावामुळे ते सर्व संपून जाते.

उद्योजक वाचला तर व्यवसाय वाचेल.

व्यवसाय वाचला तर रोजगार वाचतील.

रोजगार वाचले तर अर्थव्यवस्था वाचेल.

म्हणून पुढच्या वेळी एखाद्या उद्योजकाला भेटलात तर फक्त एवढेच विचारा—

"व्यवसाय कसा चाललाय?" नाही...

"तू कसा आहेस?"

कदाचित हा प्रश्न एखाद्याचे जीवन वाचवू शकतो.

— अतुल ठाकूर
लाइफ कॅटलिस्ट प्रा. लि.
उद्योजक घडवताना त्यांचे जीवनही जपण्याचा प्रयत्न

Be the first to react

Comments

You'll need a quick account to post. We won't spam you.

Be kind. Comments are public.

Loading comments…

Take the next step

Want this clarity in your own life or business?

Book a consultation →

Newsletter

Get new posts in your inbox

No spam. Unsubscribe anytime.