Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 11) ज्ञान वाढत जाते... पण व्यवसाय का वाढत नाही?
Atul Thakur2 Jul 20262 min read
Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 11)
ज्ञान वाढत जाते... पण व्यवसाय का वाढत नाही?
Wake Up & Scale Up ची संकल्पना आकार घेत असताना मला एक प्रश्न सतत अस्वस्थ करत होता.
तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असलेला माणूस व्यवसायात का अडकतो?
मी शेकडो उद्योजकांचे निरीक्षण केले.
त्यांच्या व्यवसायाचा प्रवास जवळून पाहिला.
आणि एक समान पॅटर्न दिसू लागला.
व्यवसायाची सुरुवात कशी होते?
मार्केटिंगमध्ये तज्ज्ञ असलेला व्यक्ती स्वतःची कंपनी सुरू करतो.
डॉक्टर स्वतःचे हॉस्पिटल सुरू करतो.
प्लंबर स्वतःची सर्व्हिस कंपनी सुरू करतो.
मेकॅनिक स्वतःचे गॅरेज सुरू करतो.
सीए स्वतःची फर्म सुरू करतो.
वकील स्वतःचे ऑफिस सुरू करतो.
सर्वांच्या सुरुवातीची गोष्ट एकच असते.
जे येते तेच करायचे... आणि त्यातून पैसे कमवायचे.
सुरुवातीला सर्व काही छान चालते.
कारण ते त्यांच्या कौशल्यावर काम करत असतात.
ग्राहक येतात.
पैसे येऊ लागतात.
आणि त्यांना वाटते...
"आपला व्यवसाय खूप छान सुरू झाला आहे."
पण हा आनंद फार काळ टिकत नाही.
खरी परीक्षा आता सुरू होते
एक दिवस अचानक व्यवसाय त्यांना नवीन प्रश्न विचारू लागतो.
GST कसे हाताळायचे?
Accounts कोण बघणार?
HR कसा उभारायचा?
Recruitment कसे करायचे?
Marketing ची रणनीती काय असणार?
Sales Process कशी तयार करायची?
Cash Flow कसा सांभाळायचा?
आता त्यांच्यासमोर दोन जग उभी राहतात.
एक...
जे त्यांना माहीत आहे.
दुसरे...
जे त्यांना अजिबात माहीत नाही.
आणि मला त्या दिवशी एक महत्त्वाची जाणीव झाली.
व्यवसाय म्हणजे...
तुम्हाला जे माहीत आहे + तुम्हाला जे माहीत नाही... यांची बेरीज.
बहुतेक उद्योजक पहिल्या भागात उत्कृष्ट असतात.
पण दुसऱ्या भागात संघर्ष करत असतात.
आणि इथेच त्यांचा खरा प्रवास सुरू होतो.
मग ते काय करतात?
ते शिकायला सुरुवात करतात.
Accounting चा कोर्स.
HR चे प्रशिक्षण.
Marketing Seminar.
Sales Workshop.
Leadership Program.
Finance Course.
Online Classes.
Offline Classes.
YouTube.
Books.
Podcasts.
Mentors.
त्यांना वाटते...
"आणखी थोडे शिकू... मग व्यवसाय सोपा होईल."
पण एक नवीन सापळा तयार होतो
हळूहळू तो उद्योजक...
एक Professional Learner बनतो.
तो सतत शिकत राहतो.
ज्ञान वाढत राहते.
प्रमाणपत्रे वाढतात.
Books वाढतात.
Courses वाढतात.
पण...
व्यवसाय तितकाच अडकलेला राहतो.
का?
कारण त्याने एक गोष्ट समजून घेतलेली नसते.
ज्ञान आणि व्यवस्थापन यात फरक आहे
Accounting माहीत असणे...
आणि Accounting Department उभारणे...
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
Marketing समजणे...
आणि Marketing System उभारणे...
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
HR शिकणे...
आणि अशी संस्था उभारणे जिथे चांगले लोक टिकून राहतील...
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
व्यवसायाला प्रत्येक गोष्ट स्वतः करणार माणूस नको असतो.
व्यवसायाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चालेल अशी रचना हवी असते.
Wake Up & Scale Up मधील पुढची जाणीव
तेव्हाच मी ठरवले...
Wake Up & Scale Up मध्ये उद्योजकांना सर्व विषय शिकवायचे नाहीत.
त्यांना प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ बनवायचे नाही.
त्यांना शिकवायचे आहे...
तज्ज्ञांकडून काम कसे करून घ्यायचे.
कारण...
यशस्वी उद्योजक तो नसतो ज्याला सर्व काही येते.
यशस्वी उद्योजक तो असतो...
जो सर्व काही स्वतः न करता, योग्य लोक आणि योग्य सिस्टम्सद्वारे परिणाम निर्माण करतो.
हीच Wake Up & Scale Up ची पुढची पायरी होती.
ज्ञान गोळा करण्यापासून... व्यवसाय उभारण्यापर्यंतचा प्रवास.
क्रमशः...
Wake Up & Scale Up ही फक्त दोन दिवसांची कार्यशाळा नाही. हा भारतीय उद्योजकाला स्वतःच्या व्यवसायातून स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या माझ्या अनेक वर्षांच्या शोधाचा प्रवास आहे.
Be the first to react
Comments
Loading comments…
Newsletter
Get new posts in your inbox
No spam. Unsubscribe anytime.