Live · 30 JuneFree Zoom session: Decoding Pasaydan & Countdown to RichesReserve →

Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 4) उद्योजक अयशस्वी होत नाहीत ... ते फक्त अपूर्ण असतात

Atul Thakur19 Jun 20262 min read
Share
Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 4)  उद्योजक अयशस्वी  होत नाहीत ... ते फक्त अपूर्ण असतात

Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 4)

उद्योजक नव्हते अयशस्वी... ते फक्त अपूर्ण होते

उद्योजकांच्या सात कैदी भिंती ओळखल्यानंतर माझ्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला.

"नेमके काय घडते की एक हुशार, कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस व्यवसायात अडकून पडतो?"

आम्ही अनेक उद्योजकांना भेटत होतो.

त्यांच्या कथा ऐकत होतो.

आणि प्रत्येक कथेमध्ये एक समान धागा दिसत होता.

त्यांना व्यवसायाचा एक भाग चांगला समजत होता.

पण संपूर्ण व्यवसाय समजत नव्हता.

डॉक्टरला उपचार समजतात... व्यवसाय नाही

जर एखादा डॉक्टर हॉस्पिटल सुरू करतो, तर त्याचे संपूर्ण लक्ष उपचारांच्या गुणवत्तेवर असते.

ते असायलाच हवे.

कारण तो डॉक्टर आहे.

पण त्याच वेळी तो अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

  • सिस्टम्स

  • SOPs

  • Recruitment

  • Training

  • Financial Planning

  • Marketing

  • Team Development

आणि मग हळूहळू तो स्वतःच आपल्या हॉस्पिटलचा कैदी बनतो.

तो दिवसभर काम करतो.

रुग्ण वाढतात.

ताण वाढतो.

काम वाढते.

पण स्वातंत्र्य वाढत नाही.

मार्केटिंग समजणे आणि व्यवसाय चालवणे यात फरक आहे

मला पुण्यातील एका उद्योजकाची भेट आठवते.

तो एका मोठ्या कृषी संस्थेमध्ये मार्केटिंग हेड होता.

त्याला मार्केटिंग उत्कृष्ट समजत होते.

म्हणून त्याने स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली.

त्याचा विश्वास होता:

"मला उत्पादन विकता येते. त्यामुळे मी व्यवसाय यशस्वी करू शकतो."

मी त्याच्या ऑफिसमध्ये जवळपास तीन तास बसलो होतो.

आणि त्या तीन तासांत मला एक गोष्ट दिसली.

त्याचा फोन एक मिनिटही शांत नव्हता.

फोन येत होते:

  • मजुरांच्या पगारासाठी

  • कॅज्युअल लेबरसाठी

  • HR साठी

  • अकाउंट्ससाठी

  • मॅन्युफॅक्चरिंगसाठी

  • डिस्पॅचसाठी

  • ग्राहकांच्या तक्रारींसाठी

प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी.

तो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत होता.

आणि त्याला वाटत होते...

"हाच व्यवसाय चालवण्याचा मार्ग आहे."

पण प्रत्यक्षात तो व्यवसाय चालवत नव्हता.

व्यवसाय त्याला चालवत होता.

एक मोठी जाणीव

त्या दिवशी मला एक सत्य स्पष्ट दिसले.

उत्पादन बनवता येणे म्हणजे व्यवसाय येणे नाही.

विक्री करता येणे म्हणजे व्यवसाय येणे नाही.

उत्कृष्ट सेवा देता येणे म्हणजे व्यवसाय येणे नाही.

कारण व्यवसाय हा एका कौशल्याचा खेळ नाही.

तो अनेक कौशल्यांची एकत्रित प्रणाली आहे.

मग प्रश्न होता...

जर हीच समस्या असेल...

तर Wake Up & Scale Up मध्ये काय शिकवायचे?

फक्त मोटिवेशन?

नाही.

फक्त मार्केटिंग?

नाही.

फक्त फायनान्स?

नाही.

मग आम्ही एक वेगळा प्रश्न विचारला.

"असा कोणता आराखडा आहे जो उद्योजकाला व्यवसायातील कर्मचारीपासून व्यवसायाचा आर्किटेक्ट बनवेल?"

आणि तिथून दोन दिवसांच्या वर्कशॉपची रचना तयार व्हायला सुरुवात झाली.

पहिला दिवस:

उद्योजक का अडकतो हे समजून घेण्यासाठी.

दुसरा दिवस:

त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक व्यवसायाची नवीन रचना तयार करण्यासाठी.

Wake Up & Scale Up आता फक्त एक कल्पना राहिली नव्हती.

ती एक प्रणाली बनू लागली होती.

एक असा रोडमॅप...

जो उद्योजकाला व्यवसायामध्ये काम करण्यापासून व्यवसायावर काम करण्याकडे घेऊन जाणार होता.

पुढील भागात...

मी सांगणार आहे की Wake Up & Scale Up च्या पहिल्या दिवसाची रचना कशी तयार झाली आणि का आम्ही सुरुवात "Technician, Manager आणि Entrepreneur" या तीन भूमिकांपासून केली.

क्रमशः...

Be the first to react

Comments

You'll need a quick account to post. We won't spam you.

Be kind. Comments are public.

Loading comments…

Take the next step

Want this clarity in your own life or business?

Book a consultation →

Newsletter

Get new posts in your inbox

No spam. Unsubscribe anytime.