Live · 30 JuneFree Zoom session: Decoding Pasaydan & Countdown to RichesReserve →

Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 5) तुम्ही व्यवसायात काम करता आहात की व्यवसायावर?

Atul Thakur20 Jun 20262 min read
Share
Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 5)  तुम्ही व्यवसायात काम करता आहात की व्यवसायावर?

Wake Up & Scale Up – जन्मकथा (भाग 5)

तुम्ही व्यवसायात काम करता आहात की व्यवसायावर?

Wake Up & Scale Up च्या पहिल्या दिवसाची रचना करताना माझ्यासमोर एक मोठा प्रश्न होता.

"उद्योजकाला नेमके कोणते सत्य दिसले पाहिजे?"

कारण जोपर्यंत त्याला त्याची खरी समस्या दिसत नाही...

तोपर्यंत तो उपाय शोधणार नाही.

माझ्यासमोर एक गोष्ट स्पष्ट होती.

बहुतेक उद्योजकांना वाटते की त्यांना व्यवसाय समजतो.

पण प्रत्यक्षात त्यांना व्यवसायाचा फक्त एक भाग समजत असतो.

आणि हे सत्य स्वीकारणे खूप कठीण असते.

कारण आपण वर्षानुवर्षे जे करत आलो आहोत, त्यालाच आपण व्यवसाय समजत असतो.

एक जुनी भेट

खूप वर्षांपूर्वी मी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलो होतो.

त्या शाळेच्या प्राचार्यांनी मला शिक्षकांचे प्रशिक्षण कसे करावे याबद्दल चर्चा करण्यासाठी बोलावले होते.

आमची चर्चा खूप चांगली झाली.

नंतर त्यांनी सांगितले,

"चला, आपल्या चेअरमनना भेटूया."

आम्ही त्यांच्या केबिनमध्ये गेलो.

चेअरमन खुर्चीवर बसले होते.

त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि पहिल्याच वाक्यात असे काही सांगितले ज्याने माझ्या व्यवसायाविषयीच्या विचारांना नवीन दिशा दिली.

ते म्हणाले:

"सर, खरं सांगतो... मला इंग्रजी बोलता येत नाही. म्हणून मी हा प्राचार्य नेमला आहे ज्याला इंग्रजी येते."

मी काही क्षण शांत बसलो.

आणि मग मला जाणवले.

इंग्रजी येणे आणि इंग्रजी शाळा चालवणे यात फरक आहे

इंग्रजी येणे पुरेसे आहे शिक्षक होण्यासाठी.

नोकरी मिळवण्यासाठी.

पण इंग्रजी शाळा उभारण्यासाठी?

ते पुरेसे नाही.

शाळा उभारण्यासाठी लागते:

  • दृष्टी

  • व्यवस्थापन

  • आर्थिक नियोजन

  • लोक व्यवस्थापन

  • सिस्टम्स

  • नेतृत्व

आणि तेव्हा माझ्या मनात एक मोठी जाणीव झाली.

उत्पादन येणे म्हणजे व्यवसाय येणे नाही

डॉक्टरला उपचार समजतात.

वकीलाला कायदा समजतो.

इंजिनियरला तंत्रज्ञान समजते.

मार्केटिंग हेडला विक्री समजते.

पण त्याचा अर्थ त्यांना व्यवसाय समजतो असा होत नाही.

कारण व्यवसाय हा व्यवसायाच्या आत केलेल्या कामांचा समूह नाही.

व्यवसाय म्हणजे अशी व्यवस्था जी परिणाम निर्माण करते.

उद्योजकांचा सर्वात मोठा सापळा

बहुतेक उद्योजक सकाळी ऑफिसमध्ये येतात.

आणि लगेच समस्यांमध्ये उडी मारतात.

  • ग्राहकाची समस्या

  • कर्मचाऱ्याची समस्या

  • उत्पादनाची समस्या

  • पैशाची समस्या

  • पुरवठादाराची समस्या

दिवस संपतो.

आठवडा संपतो.

महिना संपतो.

वर्ष संपते.

आणि मग ते म्हणतात:

"मला व्यवसायाचा विचार करायला वेळच मिळत नाही."

कारण ते व्यवसायावर काम करत नसतात.

ते व्यवसायामध्ये अडकलेले असतात.

पहिल्या दिवसाचा जन्म

तेव्हा मी ठरवले.

Wake Up & Scale Up च्या पहिल्या दिवसाची सुरुवात मार्केटिंगने होणार नाही.

फायनान्सने होणार नाही.

सिस्टम्सनेही होणार नाही.

सुरुवात होणार आहे एका आरशाने.

असा आरसा ज्यामध्ये प्रत्येक उद्योजक स्वतःला पाहील.

आणि स्वतःला विचारेल:

"मी व्यवसायाचा मालक आहे की व्यवसायातील सर्वात व्यस्त कर्मचारी?"

हा प्रश्नच पहिल्या दिवसाचा पाया बनला.

कारण जोपर्यंत उद्योजकाला हे दिसत नाही की तो व्यवसायामध्ये अडकलेला आहे...

तोपर्यंत त्याला व्यवसायावर काम करण्याची गरजच वाटणार नाही.

आणि इथेच Wake Up & Scale Up च्या पहिल्या दिवसाचा मुख्य विषय जन्माला आला:

Working IN The Business vs Working ON The Business

हा फक्त एक विषय नव्हता.

ही एक जागृती होती.

एक असा क्षण...

जिथे उद्योजक पहिल्यांदा समजतो की तो ज्या गोष्टीला व्यवसाय समजत होता...

ती प्रत्यक्षात फक्त त्याची भूमिका होती.

व्यवसाय नाही.

पुढील भागात...

मी सांगणार आहे की या जाणिवेनंतर Technician, Manager आणि Entrepreneur या तीन भूमिकांचा शोध कसा लागला आणि का हा मॉडेल Wake Up & Scale Up च्या केंद्रस्थानी आला.

क्रमशः...

Be the first to react

Comments

You'll need a quick account to post. We won't spam you.

Be kind. Comments are public.

Loading comments…

Take the next step

Want this clarity in your own life or business?

Book a consultation →

Newsletter

Get new posts in your inbox

No spam. Unsubscribe anytime.